ग्राहक सहमती व स्वीकार पत्र (Consent & Acknowledgment Form)
मी, [ग्राहकाचे संपूर्ण नाव], खालील अटी व शर्ती वाचून, समजून व मान्य करून, माझ्या संमतीने सेवा घेत आहे:
- मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी [कन्सल्टन्सीचे नाव] या खाजगी संस्था/कन्सल्टंटची सेवा घेण्यास संमती देतो/देते.
- मला माहिती आहे की, ही संस्था शासकीय संस्था नाही व शासकीय योजनेंतर्गत केवळ मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया व प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची सेवा पुरवते.
- मला जाणीव आहे कि ही योजना शासनाकडून मोफत उपलब्ध आहे, व मी हे कन्सल्टन्सी सेवा सुलभतेसाठी घेत आहे. मी यासाठी ठराविक फी देण्यास संमती देतो/देते.
- माझ्या कागदपत्रांचा, वैयक्तिक माहितीचा (उदा. आधार क्रमांक, बँक डिटेल्स, पॅन नंबर इ.) वापर अर्ज प्रक्रियेसाठी केला जाणार आहे, यास माझी पूर्ण सहमती आहे.
- अर्ज प्रक्रिया यशस्वी होईलच याची खात्री नाही, व अंतिम निर्णय संबंधित शासकीय यंत्रणेचा आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे.
- सेवा शुल्क परत न करता येण्याच्या धोरणाची मला पूर्ण माहिती देण्यात आली आहे व ती मी स्वीकारली आहे.
- वरील माहिती मी वाचून, समजून, स्वेच्छेने व कोणत्याही दबावाशिवाय मान्य केली आहे.
ग्राहकाचे नाव: ______________________
मोबाईल नंबर: ______________________
ईमेल (जर असेल तर): ______________________
सही / डिजिटल सहमती: ______________________
तारीख: ____ / ____ / _______